educational.maharashtra: NPS कपात व tax याबाबत

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Thursday 13 January 2022

NPS कपात व tax याबाबत

*NPS कपात व tax याबाबत आपल्याला पडलेल्या प्रश्नांवर थोडासा अभ्यास करून माझं स्पष्टीकरण खालील प्रमाणे आहे....*


NPS चे *टीअर 1 व टिअर 2* असे दोन भाग आहेत.... *टीअर 1* हे पेंशन खाते आहे तर *टीअर 2* हे अतिरिक्त बचत खाते आहे... *टिअर 2* हे टॅक्स पूर्णपणे फ्री  खाते नाही...


 मात्र *टीअर 1* हे टॅक्स बचत करता येणारे पेंशन खाते आहे त्याचा अभ्यास करू...👇


     टॅक्स भरण्यासाठी आपली कपात ही *80C* या सेक्शनमध्ये 150000 पर्यंत बचत करता येते त्यापेक्षा अधिक रक्कमेवर आपल्याला टॅक्स द्यावा लागतो....

         NPS योजनेच्या बाबतीत मात्र 80C चे 3 भाग केलेले *पहिला भाग 80CCD (1), दुसरा भाग 80CCD(1b) तिसरा भाग आहे 80CCD (2)* आहेत माझ्या अभ्यासानुसार त्याचे खालील प्रमाणे विश्लेषण करता येईल....


*1)पहिला भाग 80CCD (1)*- यात LIC,होम लोन यासह 10% NPS कपातीसाठी 1,50,000 पर्यंत बचत करण्यासाठी सूट मिळते...(NPS कपात मात्र 1 लाखापर्यंतच करता येत)


*2)दुसरा टप्पा 80CCD (1b)* यासह दुसऱ्या टप्प्यात फक्त NPS धारकांना पुन्हा 50,000 पर्यंत बचत करण्यासाठी अतिरिक्त सूट दिली जाते....


*3)तिसरा टप्पा 80CCD (2)* हा टप्पा शासनाचा 14% एकूण वेतनात जमा होणारी रक्कम बचत करता येते तिला मर्यादा नाही...म्हणजे आपल्या खात्यात जमा होणारी 14% रकम ही पूर्णपणे टॅक्स फ्री आहे....


*आपण एक उदाहरण बघू...*


एका कर्मचाऱ्याची वर्षभरात NPS कपात 10% प्रमाणे  एकूण 90000  रुपये कपात झाली......शासन हिस्सा 14% प्रमाणे 1,60,000 हजार रुपये मिळाला...

LIC,होम लोन व इतर बचत ही 110000 हजार झाली....


*पहिल्या 80CCD (1)* टप्प्यात जेथे 1,50,000 रुपये बचत करायची आहे, त्या ठिकाणी उदाहरणातील 90,000 NPS कपात पैकी तुम्ही 40000 रक्कम बचत दाखवू शकतात...व वरील प्रमाणे इतर बचत LIC, होम लोन  1,10,000 बचत  म्हणजे तुमचं 1,50, 000  रुपयांचे लिमिट संपेल....पण NPS मधिल  50,000 उत्पन्न बाकी आहे....


*2)दुसऱ्या 80CCD(1b)* या NPS धरकांसाठी बनविलेल्या टप्प्यात वरील 50,000 बचत दाखविता येईल....म्हणजे TAX  0 (शून्य) लागेल....


*3) तिसरा 80CCD (2)* या टप्प्यात 14% प्रमाणे जमा शासन हिस्सा 1,60,000 रुपये टाका...या ठिकाणी बचतीचे लिमिट नाही....

     अशा प्रकारे NPS व TAX याबाबत इन्कम टॅक्स साईट व याबाबतच्या अनेक व्हिडीओचा अभ्यास केल्यावर विश्लेषण करता आले..


आपला मुख्य उद्देश व लढा *जुनी पेंशन* मिळावी हाच आहे...त्यासाठी आपला लढा कायम आहे...फक्त आपण NPS योजना स्विकारली त्याबाबतीत TAX बाबत आपले समज-गैरसमज दूर व्हावेत हा हेतू.....

धन्यवाद...

🙏🙏🙏

आपलाच

*श्री.संदीप जगन्नाथ पाटील*

*जिल्हाकार्याध्यक्ष* जुनी पेंशन संघटना जळगाव.

*केंद्रप्रमुख* तोंडापुर ता.जामनेर...

*शिक्षक हितार्थ टिम जामनेर*


*पोस्ट फॉरवर्ड करतांना कुणीही नावात व इतर बदल करू नये ही विंनती*

https://educationalmaharashtra.blogspot.com/

2 comments:

  1. Thanks for Sharing this your blog is really nice. i really like about Education. Our certification is a guarantee to attract more international clients and get the best online professional trainer. Online personal trainer certifications are what is required to be a credentialed trainer for employment (both online and in-person).Professional coaches transform people’s lives by helping them discover their true purpose, identify their change needs, and support them throughout the process.

    ReplyDelete
  2. Thanks for Sharing this your blog is really nice. i really like about Education. ecadema is an online learning portal and offers trainer programs online professional learning platform, which helps the international students to get the certification of various courses from professional trainers through online classes.Teaching is a continuous process of transmitting accumulated knowledge, skills, and values from one generation to another

    ReplyDelete