educational.maharashtra: मकरसंक्रांत पौराणिक कथा

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Thursday 13 January 2022

मकरसंक्रांत पौराणिक कथा

⚜️मकरसंक्रांत पौराणिक कथा⚜️
                 
     श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता.  

     यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजाच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनी देवाची राशी मानले जाते ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल-अपेष्टा सहन करावी लागली. यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी ला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्य देवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की, शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धन-धान्याने भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की, मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत.

     🔆मकरसंक्रांतीचे सामाजिक व वैज्ञानिक कारण🔆

*मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते.


No comments:

Post a Comment