educational.maharashtra: शाळा सिद्धी बाबत माहिती 2021/22

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

शाळा सिद्धी बाबत माहिती 2021/22

 शाळा सिद्धी बाबत माहिती 2021/22 


संदर्भ :-

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१२/२०१६) एस.डी.६, दि.३०/०३/२०१६

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.शैगुवि/२०१६/(१८९/२०१६) एस.डी.६,दि.०७/०१/२०१६

३.या कार्यालयाचे पत्र जाक्र/मराशैसंप्रप/शाळासिद्धी/२०१९-२०/४७८४ दि.०६/१२/२०१९


उपरोक्त संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे महत्त्वाचेअसून शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे.

त्यानुसार राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा,नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे.संदर्भिय शासन निर्णयानुसार दरवर्षी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे.

संदर्भ क्रं ३ अन्वये आपण आपल्या जिल्हयातील शाळासिध्दी संपर्क अधिकारी (NodalOfficer) व तालुकास्तरीय शाळासिध्दी संपर्क अधिकारी यांची निवड केली आहे.

 शाळासिध्दी कार्यक्रमासाठी निपा, नवी दिल्ली यांच्या www.shalasiddhi.niepa.ac.in या वेबपोर्टलवरील सन २०२१-२२ च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची टॅब सुरु झाली आहे. सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे सन २०२१ -२२  मधील स्वयंमूल्यमापन पूर्ण करून  भरावयाची आहे. 

शाळासिध्दी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती www.shalasiddhi.niepa.ac.in वेबपोर्टलवर आहे .वेबपोर्टलचा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर माहिती ( USERMANUAL) देण्यात आली आहे .

यासोबत मराठी माध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील उपलब्ध आहे. सर्व शाळांनी सन २०२१ -२२ मधील स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे.

सन २०२१ -२२  चे शाळांचे स्वयंमूल्यमापन करतांना मुख्याध्यापकांनी शाळासिध्दीची स्वतंत्र संचिका करून त्यात USERNAME आणि PASSWORD स्वत:च्या ताब्यात ठेवावे. मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्यावेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकाकडे हस्तांतरीत करावी.

सन २०२१ -२२ चे स्वयंमूल्यमापनपूर्ण केलेल्या शाळांनी त्याची हार्ड कॉपी सदर संचिकेत लावावी व असे दरवर्षी करावे. तरी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/मनपा), शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी यांनी आपल्या अधीनस्त अधिका-यांमार्फत १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करून घेण्याबाबत कार्यवाही करावी.अशा प्रकारे 30/03/2021 रोजीचा वरील G.R.आहे.

====================================

*शाळा सिध्दी 2021-22 महत्त्वाचे*   

   ✳️कृपया शाळा सिध्दी स्वयमूल्यमापन करतांना संपूर्ण अभ्यास करून माहिती भरावी, अगोदर कच्ची माहिती भरून घ्यावी व नंतर ऑनलाईन करावी, एकदा की माहिती ऑनलाईन भरून झाली की त्यात कोणताही बदल पुन्हा करता येत नाही.

---------------------------------------------------------------

☸️ विद्यार्थी माहिती ही चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 ची लिहावी ..

----------------------------------------------------------------------     

🌀 वर्गनिहाय वार्षिक उपस्थिती ही 2020-21 ची येईल ,

 मात्र त्याची सूत्रानुसार टक्केवारी काढून भरावी ...

-------------------------------------------------------------------------

❇️वर्गनिहाय वार्षिक निकाल हा 2020-21 चा घ्यावा व दिलेल्या श्रेणीनुसार त्या त्या वर्गाची विद्यार्थी संख्या विभागून ती टक्केवारी भरावी ...

-------------------------------------------------------------------

💠 शिक्षक माहिती ही 2021-22 ची भरावी

 व शिक्षक उपस्थिती (रजा)ही 2020-21 ची माहिती भरावी ..

---------------------------------------------------------------------

☮️ 7 क्षेत्रांची माहिती ही 2021-22 ची भरावी

स्तर 1 साठी priority ही High असेल , 

स्तर 2 साठी Medium तर

स्तर 3 साठी Low येईल  ..

------------------------------------------------------------------


            ♠️ मिशन स्टेटमेंट हे तुम्ही आगामी शैक्षणिक वर्षात कोणत्या गोष्टीवर प्राधान्याने काम करणार आहात त्यावर आधारित असेल ♠️

--------------------------------------------------------------------


           🟣 School Improvement Plan ( शाळा सुधारणेचे नियोजन ) भरताना शाळा सुधारण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न केले पाहिजे तसेच स्तर वाढविण्याच्या बाबी , प्रस्तावित कार्यवाही/नियोजन कृती,आवश्यक मदत/घटक आणी पुढील कृती या बाबी तुम्ही त्या त्या क्षेत्रात लिहायच्या आहेत ..

---------------------------------------------------------------------


🔷 स्तर 1 साठी 1 गूण ,  

स्तर 2 साठी 2 गूण  

स्तर 3 साठी 3 गूण आहेत . 

---------------------------------------------------------

तुमच्या शाळेत असणाऱ्या विविध सुविधा आणी शाळेतील विविध घटक यातील फरक जाणून वरील योग्य त्या स्तरानुसार गूण द्यावे . यासाठी शाळा सिध्दी ची मराठी तील पुस्तिकेचे वाचन करावे ..

----------------------------------------------------------------


       यावेळी बाह्यमूल्यमापन होण्याची शक्यता आहे , 

त्यामुळे तुम्ही भरलेली माहिती ही पुन्हा चेक होईल 

त्यामुळे घाई न करता काळजीपूर्वक माहीती भरावी .

--------------------------------------------------------


No comments:

Post a Comment