educational.maharashtra: August 2022

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Sunday 21 August 2022

आंतर जिल्हा बदली

*3943 बदल्यावर ग्रामविकास विभागाकडून शिक्कामोर्तब*🚩🚩🚩🚩🚩



जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया काल दि.२१ ऑगस्ट रोजी विंसिस या खाजगी कंपनीकडून ओटीटी सॉफ्टवेअर द्वारे पार पडली होती.या प्रक्रियेत ३१ तासात ३९४३ शिक्षकांच्या बदल्या ३४ जिल्हा परिषद मधून पूर्ण झाल्याची जिल्हा निहाय आकडेवारी सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.या आकडेवारी बाबत अनेक शिक्षकांनी शंका उपस्थित केल्याने संघटनेकडून बदली झालेल्या आकडेवारी बाबत सत्यता व खातरजमा पळताळून पाहण्यासाठी बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष मा.आयुष प्रसाद व राज्य समन्वयक मा.सचिन ओंबासे साहेब यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ३९४३ शिक्षकांच्या आकडेवरीला दुजोरा दिला.मात्र त्याचवेळी विन्सिस कंपनीचे अधिकारी निलेश देवदास यांनी आम्ही कंपनीकडून कुठलीही अधिकृत व कार्यालयीन प्रमाणित माहिती आंतरजिल्हा बदली विषयी जाहीर केलेली नसून जी माहिती सोशल मीडियावर पसरविल्या गेली ती कंपनीकडून देण्यात आलेली नसून प्रमाणित व अधिकृत नसल्याचे सांगण्यात आले.या दोन्ही परस्पर विरोधी भूमिकेने आंतरजिल्हा बदली च्या सत्य आकडेवारी बाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता.झालेल्या आंतरजिल्हा बदल्या ह्या मराठी व उर्दू दोन्ही माध्यमाच्या एकत्रित असून ३४ जिल्हा परिषदेची आउटगोइंग अंतिम आकडेवारी ही ३९४३ हिच असल्याचे सांगण्यात आले.मात्र ती कंपनीकडून ऑफिशियली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.झालेल्या बदल्या ह्या साखळी व रिक्त अश्या दोन्ही प्रक्रियेने झाल्याचेही सांगण्यात आले.याबाबत अधिक सविस्तरपणे असे की , प्रत्येक ५० शिक्षकांपैकी एकाची त्यांच्या आवडीनुसार नवीन जिल्ह्यात सेवा देण्यासाठी बदली करण्यात आलेली आहे.अंदाजे १,९४८५९ जिल्हा परिषद शिक्षकांपैकी २.०२% शिक्षकांच्या बदल्या या प्रक्रियेत झाल्या आहेत.

आंतरजिल्हा बदलीसाठी एकूण ११ हजार ८७१ शिक्षकांनी ओटीटी सॉफ्टवेअर द्वारे अर्ज केले होते . अर्जदारांपैकी ३३.२१% शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.ही आतापर्यंतची सर्वाधिक बदली संख्या असून २०१९ मध्ये झालेल्या तिसऱ्या टप्प्यात  ती ८.९१%  , २०१८ दुसऱ्या टप्प्यात १८.३६% आणि २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात ती २४.५६% इतकी होती.झालेल्या बदल्या ह्या अधिकाधिक शक्य तितक्या करण्यात आलेल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अखेर ग्रामविकास विभागाकडून याबाबत स्पष्ट चित्र पुढे आल्याने आंतरजिल्हा बदल्या ह्या ३९४३ इतक्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्व शिक्षक बांधवांचा संभ्रम वेळीच दूर व्हावा या उद्देशाने मंत्रालय स्तरावरील चर्चेतून ही माहितीपर पोस्ट देण्यात येत आहे.

*यापूर्वी झालेल्या बदल्यांची आकडेवारी थोडक्यात पुढीलप्रमाणे ,*
२०१७ टप्पा १ - एकूण अर्ज २१,९७४ , पैकी बदल्या ५,३९९ , सन २०१८ टप्पा २- एकूण अर्ज १९,३४७ पैकी बदल्या ३,५५३ , सन २०१९ टप्पा ३ - १३,५५८ पैकी बदल्या १,२११ , सन २०२० टप्पा ४ - अर्ज १२,३४७ पैकी बदल्या १,८९० अश्या प्रकारे मागील चार टप्प्यात एकूण १२ हजार ५३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.तर आता यावर्षीच्या २०२२ मध्ये ३,९४३ मिळून आज रोजी पर्यंत १५ हजार ९९६ शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या पूर्ण झाल्या आहेत.

उपरोक्त माहिती ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून ग्रामविकास विभाग स्तरावरून नुकतीच घेण्यात आलेली आहे.आज दि.२२ रोजी दुपारी आंतरजिल्हा बदलीचे आदेश ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीष महाजन साहेब यांचे हस्ते प्रकाशित केली जाणार असून नंतर ती लगेच शिक्षकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हांतर्गत बदली विषयी सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल.


बदली झालेल्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन
🚩🚩🚩🚩🚩🚩
*खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य*

Saturday 13 August 2022

जवाहर नवोदय विद्यालय बाबत संपूर्ण माहिती

*"जवाहर नवोदय विद्यालय"*
*A to Z माहिती*

*हा एक मेसेज मुलांच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरेल.*

  *इ. 5 वी च्या पालकांपर्यंत व मुलांना share करा.*

'जवाहर नवोदय विद्यालय’  ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो. येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते. या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी -प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे 6000-7000 विद्यार्थी नवोदय ची परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी -12वी मोफत शिक्षण मिळते. ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी  देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.

देशातील गुणवंत, गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यातच मोफत दर्जेदार शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. यानुसार भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यातच उच्च दर्जाच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या जिल्ह्यानिहाय नवोदय विद्यालय सुरू करण्यामागचा केंद्र सरकारचा मुख्य हेतू आहे. केंद्र सरकारने १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी) मंजूर केले आहे. या धोरणातील तरतुदीचाच एक भाग म्हणून भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेली ही स्वायत्त संस्था आहे. येथील अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) असतो.

या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नि: शुल्क शिक्षण देण्यात येते. निवास व भोजनाची मोफत सोय केली जाते. याशिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके, क्रीडा साहित्य, लेखन सामग्री, स्टेशनरी आदींचा सर्व खर्चही विद्यालयामार्फतच करण्यात येतो. या विद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी ७५ टक्के जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी दरवर्षी लेखी परीक्षा घेण्यात येते. या परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

●प्रवेशासाठी पात्रता निकष:
इच्छुक विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असावा
फक्त स्वत:च्या जिल्ह्यातच प्रवेश घेता येतो
संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणे अनिवार्य
प्रवेशासाठी निश्र्चित केलेली वयाची अट पुर्ण करावी लागते
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.
 
● आवश्यक कागदपत्रे:
विहित नमुन्यातील अर्ज
पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याबाबतचा सक्षम पुरावा
जन्म प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास, जात प्रमाणपत्र
अर्जदार विद्यार्थ्याची दोन छायाचित्रे.

● अर्ज कुठे कराल?
या प्रवेशाबाबतच्या लेखी परीक्षेची जाहिरात दरवर्षी स्थानिक पातळीवरील दोन नामवंत दैनिकांत प्रसिद्ध होत असते. आपला पाल्य शिक्षण घेत असलेल्या शाळांकडे आपापल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या पत्ता उपलब्ध असतो. जाहिरातीत दर्शविलेल्या ठिकाणी अर्ज करावा लागतो.

● नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय?
इयत्ता 9 वीच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage या वेबसाईटला भेट द्यावी तर सहावीच्या वर्गासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावा.

 
● नवोदय प्रवेश परीक्षा चाचणी स्वरूप व माहिती

1. चाचणीचे स्वरूप

·         एकच संयुक्त प्रश्नपत्रिका : 100 गुण

·         वेळ : 2 तास

·         मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

- विभाग एक

·         मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयात एकूण दहा भाग असतात. दहा भागांत प्रत्येकी चार-चार प्रश्न असून एकूण 40 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात. प्रत्येक

 भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश आहे.

-  विभाग दोन

·         अंकगणित : (20 प्रश्न 25 गुण)

 या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उददेश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूतक्षमता तपासणे हा आहे.

 टीप : अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो.


-  विभाग तीन
·         भाषा : (20 प्रश्न 25 गुण)
यात 4 उतारे असतात.प्रत्येक उताऱ्यात 5 प्रश्न असतात.तुमचे भाषा विषयाचे ज्ञान यातून तपासले जाते.

🎖️🥇🥇

Friday 12 August 2022

PM Awas Yojana Update: अगर आप भी पीएम आवास के लाभार्थी हैं तो ये खबर जरूर पढ़ लें. सरकार ने पीएम आवास को लेकर बड़ा ऐलान किया है. इस ऐलान के बाद लाखों लोगों को बड़ा फायदा होगा.

PM Awas Yojana Update: अगर आप भी पीएम आवास के लाभार्थी हैं तो ये खबर जरूर पढ़ लें. सरकार ने पीएम आवास को लेकर बड़ा ऐलान किया है. इस ऐलान के बाद लाखों लोगों को बड़ा फायदा होगा.

PM Awas Yojana: पीएम आवास के लाभार्थी हैं तो ये खबर जरूर पढ़ लें. सरकार ने पीएम आवास को लेकर बड़ा ऐलान किया है. 

पीएम आवास योजना को लेकर बड़ा ऐलान

सरकार के इस ऐलान के बाद आप सभी को बड़ा फायदा मिलेगा. प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G Scheme) को 2024 तक जारी रखने को मंजूरी मिल गई है.

गौरतलब है कि सरकार ने PM आवास योजना- ग्रामीण के तहत 2.95 करोड़ पक्के मकान अलॉट करने का लक्ष्य रखा है. अब तक लगभग 2 करोड़ पक्के आवास बना कर दिए गए हैं. लेकिन अब भी कई ऐसे परिवार बाकी हैं, जिन्हें ध्यान में रखते हुए प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण को 2024 तक जारी रखने को मंजूरी दी गई है. इससे लाखों ग्रामीणों को बड़ा फायदा होगा. 


सरकार ने दी जानकारी 

सरकार की तरफ से दी गई जानकारी के अनुसार, इस योजना में केंद्र सरकार का कुल खर्च 1,43,782 करोड़ रुपये होगा और इसमें नाबार्ड को लोन के इंट्रेस्ट पेमेंट के लिए 18,676 करोड़ रुपये शामिल है. दरअसल, सरकार इस योजना के जरिए पहाड़ी राज्यों को भी 90 फीसदी और 10 फीसदी के आधार पर पेमेंट करती है. जबकि बाकी केंद्र और राज्यों का 60 फीसदी और 40 फीसदी पेमेंट होता है. जबकि केंद्र शासित प्रदेशों में सरकार 100 फीसदी पैसे खर्च करती है. 



====={==}====={==}===={==}=====

Wednesday 3 August 2022

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे

🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

*आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे*

खालील प्रक्रिया FOLLOW करा
               👇

👉 *Voter Helpline हे app डाऊनलोड करा*    
                     ⬇️
👉 *Voter Registration ला क्लिक करा*          
                     ⬇️
👉 *फॉर्म 6 b ला क्लिक करा* 
                     ⬇️
👉 *Lets start ला क्लिक करा* 
                     ⬇️
👉  *आपला मोबाईल नंबर टाका*
                     ⬇️
👉  *आपल्याला OTP येईल तो टाका* 
                     ⬇️
👉 *OTP टाकल्यानंतर verify ला क्लिक करा*   
                     ⬇️
👉 *Voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा* 
                     ⬇️
👉 *Voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा* 
                     ⬇️
👉 *नंतर proceed क्लिक करा* 
                     ⬇️
👉 *आता तुमचा आधार नंबर टाका**
                     ⬇️
👉 *Done करा व confirm ला क्लिक करा.*

*तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला जोडल्याचा संदेश येईल.*







*आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे*
खालील प्रक्रिया FOLLOW करा
1.voter helpline हे app डाऊनलोड करा
2.voter registration ला क्लिक करा
3.फॉर्म 6 b ला क्लिक करा
4.Lets start ला क्लिक करा
5.आपला मोबाईल नंबर टाका
6.आपल्याला otp येईल तो टाका
7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
8.voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा
9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
10.नंतर proceed क्लिक करा
11.आता तुमचा आधार नंबर टाका
12.Done करा व confirm ला क्लिक करा.
*तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.**💐💐💐💐
वरील प्रमाणे सर्व मतदारांनी  निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.