🏷️ वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी केली आहे, परंतु नोंदणी करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे. किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे.
तर SCERT च्या वतीने माहिती दुरुस्ती करण्यासाठी परत एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
👉काय आवश्यक आहे ?
यासाठी आवश्यक आहे. तुमचा नोंदणी क्रमांक.
👉 काय काय बदल करता येईल?
🛠️प्रशिक्षण प्रकार बदलता येईल
🛠️प्रशिक्षण गट बदलता येईल.
🛠️डबल नोंदणी रद्द करता येईल
👉त्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.
प्रशिक्षण संबंधित इतर माहिती
महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.
या संदर्भात सूचना पुढीलप्रमाणे :-
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.
- दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- प्रशिक्षण नोंदणी दि. २३ नोव्हेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२१ पर्यत सुरु होती. मुदतवाढ 5 जानेवारी 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे.
- सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबात नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधिताना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत. गट क्र. १ - प्राथमिक गट , गट क्र. २ - माध्यमिक गट, गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट, गट क्र. ४ - अध्यापक विद्यालय गट
- प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
- नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकवर तत्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
- प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येईल.
- नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण महती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास " माहितीत बदल करा." या बटनावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्हासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
- सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी २०००/- रु. शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे.
- यासाठी स्वताच्या बँक खात्याचा सर्व तपशील सोबत ठेवावा.
- नोंदणी अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास स्वताच्या रजिस्टर इमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणीसाठी खालिल चित्राला क्लिक करा.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी यासंदर्भात SCERT महाराष्ट्र यांच्या वतीने काढलेला आदेश खाली वाचू शकता.
Link
http://training.scertmaha.ac.in/
23-11-2021 ते 23-12-2021 या काळात ट्रेनिंग साठी नाव नोंदणी करता येईल *म्हणजे आज व उद्या दोनच दिवस शिल्लक आहेत.*
*प्रशिक्षण याविषयी*
_*महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.*_
_वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण_
_हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण_ _केलेल्या शिक्षकांसाठी आहे_
*प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये*
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
*पात्रता निकष*📑📒
उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१२ वर्षाची अर्हताकारी सेवा
या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
👉🏻अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
👉🏻ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
*निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण*
_हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे_
*प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये*
बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
👉🏻शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
👉🏻शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
जागतिकीकरण,
👉🏻आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम
*पात्रता निकष*📑📒
_उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे._
*२४ वर्षाची अर्हताकारी सेवा*
👉🏻अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
👉🏻ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
क)
*प्राथमिक शिक्षकांसाठी –* प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
*प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी* – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
*माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी* पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.
*प्रशिक्षण शुल्क*💷
प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाइन अदा करावे. एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
💳 *शुल्क*
₹२०००
प्रती प्रशिक्षणार्थी
No comments:
Post a Comment