मत्ता व दायित्व विवरण माहिती
प्रपत्र -१
टीप :- (१) स्तंभ ४ मध्ये खालील बाबी दर्शविण्यात याव्यात.
(अ) जेथे खरेदी, गहाण किंवा लीजद्वारे मालमत्ता संपादन काण्यात आली असेल तेथे अशा संपादनासाठी दिलेली किंमत किंवा प्रिमियम ( चढभाव )
(ब) ती लीजद्वारे ( भाडेपटटीद्वारे ) संपादित करण्यात आली असेल तर तिचे वार्षिक भाडे आणि
(क) जर वारसा, भेट किंवा अदलाबदल करून ती संपादन काण्यात आली असेल तर संपादन केलेल्या मालमत्तेचे अंदाजित मूल्य.
(२) जर शासकीय कर्मचारी हा हिंदू अविभक्त कुटुंबातील असून त्या कुटुंबाच्या संपत्तीमध्ये त्याचे कर्ता म्हणून किंवा कुटुंबिय म्हणून समवायता अधिकार असतील तर त्याने अशा संपत्तीतील त्याच्या हिश्यांचे मूल्य दर्शवावे किंवा अशा हिश्यांचे नेमके मूल्य दर्शवणे शक्य नसल्यास त्याने त्याचे अंदाजे मूल्य नमूद करावे. आवश्यक तेथे योग्य अशा स्पष्टीकरणात्मक टिपा जोडाव्यात.
प्रपत्र - २
टीप :- (१)सदर प्रपत्रात खालील बाबींचा समावेश असावा.
(अ) सर्व रोकड सुलभ मत्ता, जसे रोकड, सर्व प्रकारची बँक खाती, आवर्त ठेव खाती, मुदतबंद ठेवी, कॅश सर्टिफिकेट, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाती, सक्तीच्या बचत ठेवींची खाती ( आयकर दात्यांसाठी पोष्ट ऑफिस बचत खाती, पोष्ट ऑफिसमुदतबंद ठेवींची खाती, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे, मुदतीच्या आवर्त ठेवी, शेअर्स, कर्जरोखे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची युनिट, हुंडया, कर्जे इत्यादी सर्व प्रकरणी ठेवीची रक्कम, मूल्य, दर्शनी मूल्य इत्यादी माहिती नमूद करावी.
(ब) सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी / अंशदायी भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा पॉलिसी, पोष्टल विमा
पॉलिसी,सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतील / अंशदायी भविष्य निर्वाह निधीतील जमा रक्कम व प्रत्येक
विमा पॉलिसीद्वारे आश्वासित असलेली रक्कम दर्शविण्यात यावी..
(क) जडजवाहीर ( एकूण मूल्य दर्शवावे. )
(ड) चांदी व इतर बहुमोल धातू व जडजवाहीर मोडत नसलेली मौल्यवान रत्ने ( सर्वाचे एकूण मूल्य ) आणि
(इ) इतर जंगम मालमत्ता जसे की मोटार गाडया, स्कूटर्स / मोटार सायकल, रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर, रेडिओ /
रेडिओ ग्राम / टी. व्ही. सेट ( दूरचित्रवाणी संच ), ज्याची किंमत रु. २०००/- पेक्षा जास्त आहे अशा इतर वस्तू ( रोजच्या वापरातीलम्हणजे कपडे, भांडी, पुस्तके, काच सामान इत्यादी वस्तू वगळून ) प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे मूल्य दर्शविण्यात यावे.
(२) वरील टीप (१) (अ) मध्ये दर्शविलेल्या रोकड सुलभ मत्तेबाबत टीप (१) (ब) मध्ये दर्शविलेल्या भविष्य निर्वाह निधी / अंशदायी भविष्य निर्वाह निधी आणि विमापत्रे ( इन्शूरन्स पॉलिसीज ) याबाबतचे वर्णन स्तंभ
२ मध्ये नमूद करावे. ( बँकेचेनाव, पत्ता, पोष्ट ऑफिसचा पत्ता, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या शाखेचा पत्ता, कंपनी / फर्म / ॠणको यांचे पत्ते ) इत्यादी पूर्ण तपशिल स्तंभ ३ मध्ये नमूद करण्यात यावा.
(३) भाडे खरेदी तत्वावर व हप्तेबंदीवर घेतलेल्या वस्तूंच्या पोटी हे विवरण सादर करण्याच्या दिनांका पर्यत भरलेली रक्कम नमूद करावी.
प्रपत्र – ३
टीप :- (१) तीन महिन्याच्या वित्तलब्धीची रक्कम किंवा रुपये 1000/- या दोहोंपैकी कमी असेल त्या रक्कमेपेक्षा अधिक नसणारी प्रत्येक कर्जाची रक्कम नमूद करण्याची आवश्यकता असणार नाही.
(२) वित्तलब्धी या संज्ञेचा अर्थ शासकीय कर्मचा-यास मिळणारे वेतन व भत्ते असा समजावा.
(३) या विवरणपत्रात वाहन खरेदीसाठी अग्रीम, घरबांधणीसाठी अग्रीम ( वेतन अग्रीम आणि प्रवास भत्याचे अग्रीम,सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतून घेण्यात आलेली अग्रीमे आणि विमापत्रावर आणि कायम ठेवीवर काढलेले अग्रीम या व्यतिरिक्त )इत्यांदिसारख्या शासकीय कर्मचा-याने घेतलेल्या कर्जाच्या अग्रीमांचाही अंतर्भाव करावा.
Best blogspot!
ReplyDelete