educational.maharashtra: 2025

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Sunday, 27 July 2025

आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?

आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?

तुमच्या फोनवर Ayushman App डाउनलोड करा आणि भाषा निवडा.
नंतर लॉगिन करा आणि Beneficiary वर क्लिक करा.
यानंतर कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाका
फोनमध्ये Beneficiary Search पेज उघडेल.
त्यात पीएम-जे योजना निवडा आणि तुमचा राज्य, जिल्हा आणि आधार क्रमांक भरून लॉगिन करा.
यानंतर ज्या कुटुंबाचे आयुष्मान कार्ड बनले आहे त्यांची यादी दिसेल. मात्र ज्याचे कार्ड बनलेले नाही, त्यांच्या नावासमोर ऑथेंटिकेट असा पर्याय दिसेल
ऑथेंटिकेटवर टॅप करा, आधार क्रमांक टाका- ओटीपी टाका आणि फोटोवर क्लिक करा.
यानंतर, सदस्याचा फोन नंबर आणि नाते लिहा.
ई-केवायसी पूर्ण करा आणि फॉर्म सबमिट करा.
एका आठवड्यात व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुम्ही हे कार्ड अॅपवरून डाउनलोड करू शकता.
आयुष्मान कार्डसाठी लागणारी कागदपत्रे

आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, फोन नंबर, रेशन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल. तसेच कामगार कार्ड, ई-श्रम कार्ड किंवा सरकारी ओळखपत्राच्या मदतीने तुम्ही कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहात की नाही याची माहितीही मिळेल.

Wednesday, 5 March 2025

transfer portal profile updation

*बदली पोर्टल प्रोफाइल बाबत महत्वाचे*
(सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या)

👉🏻 बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने प्रोफाईल पडताळून पाहणे आवश्यक आहे.आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.

👉🏻 माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.

👉🏻 लॉग इन पहिल्या वेळी केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत आणि Accept करा.

👉🏻 वर डाव्या बाजूला मेनू बार आहे ( आडव्या लाईन्स) त्यात Profile पर्याय आहे तिथे प्रोफाइल दिसते.त्यावर Click करा.

👉🏻 Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.

*👉🏻 Personal Details मधील सर्व माहिती तपासून घ्या अचूक असल्याची खात्री करा.* यासाठी शक्य होत असल्यास तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.

✅First Name
✅Middle Name
✅Last Name
✅Date Of Birth
✅Gender
✅Mobile Number (लॉग इन आयडी,लॉग इन OTP येतो)
✅Adhar (चुकला असला तरी दुरुस्ती होणार नाही,बदली प्रक्रियेवर काहीही परिणाम होणार नाही)
✅PAN 
✅E-Mail (फॉर्म ची PDF, OTP येतो)
✅SHALARTH ID 
✅Marital Status (Kuamri/Widow/Divorced.....महिलांना संवर्ग एक साठी यातील अचूक नोंद अत्यावश्यक आहे)

*👉🏻 Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक असल्याची खात्री करावी* यासाठी शक्य होत असल्यास तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.

👉🏻 Date of Apponitment in ZP-सेवेत प्रथम रुजू दिनांक.

👉🏻 Cast category – जातीचा संवर्ग

👉🏻Appointment Category- निवडीचा प्रवर्ग

👉🏻 Current District Joining Date- सध्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांक

👉🏻 Udise Code of Current School- कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा. 

👉🏻 Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.

👉🏻 Current Teacher Type - Graduate पदवीधर/विषय शिक्षक/Under Graduate प्राथमिक शिक्षक/ Headmaster मुख्याध्यापक 

👉🏻 Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांच्या साठी भाषा Language/ गणित-विज्ञान Maths Science/ समाजशास्त्र Social Science यापैकी जे असेल ते इतरांनी Not Applicable NA हे ऑप्शन राहील.

👉🏻 Teaching MEDIUM- यामध्ये आपल्या शाळेचे मेडियम असेल

👉🏻 Last Transfer Category – सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग... 
1. Cadre 1 संवर्ग 1
2. Cadre 2 संवर्ग 2
3. Entitle संवर्ग 3 बदली अधिकार प्राप्त शिक्षक
4. Eligible संवर्ग 4 बदली पात्र शिक्षक
5. NA- NOT APPLICABLE 
*हे मागील बदली कशी झाली याबाबत आहे.*

👉🏻 Last Transfer TYPE- सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा INTER DISTRICT की जिल्हांतर्गत INTRA DISTRIC बदली होवून आलात तो प्रकार असेल.या पेक्षा वेगळे असेल तर N/A NOT APPLICABLE. *हे मागील बदली कशी झाली याबाबत आहे.*

👉🏻Current Area Joining Date- सध्या आपण सर्वसाधारण किंवा अवघड क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात रुजू दिनांक.

👉🏻Have You Worked Continuosly In Non Difficult Area For 10 Years-
आपली सुगम क्षेत्रात सतत सेवा 10 वर्ष झाली आहे का....

👉🏻Have You Been Suspended in last 10 Years- शेवटच्या 10 वर्षात आपण निलंबित झाले आहेत का...