!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.
Tuesday, 25 January 2022
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक
Friday, 21 January 2022
जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली update
Wednesday, 19 January 2022
Monday, 17 January 2022
ई-श्रम कार्ड e shram card
Sunday, 16 January 2022
वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण UPDATE
Friday, 14 January 2022
LPG Subsidy खात्यात येत आहेत कि नाही असे करा चेक
Thursday, 13 January 2022
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता
मकरसंक्रांत पौराणिक कथा
NPS कपात व tax याबाबत
*NPS कपात व tax याबाबत आपल्याला पडलेल्या प्रश्नांवर थोडासा अभ्यास करून माझं स्पष्टीकरण खालील प्रमाणे आहे....*
NPS चे *टीअर 1 व टिअर 2* असे दोन भाग आहेत.... *टीअर 1* हे पेंशन खाते आहे तर *टीअर 2* हे अतिरिक्त बचत खाते आहे... *टिअर 2* हे टॅक्स पूर्णपणे फ्री खाते नाही...
मात्र *टीअर 1* हे टॅक्स बचत करता येणारे पेंशन खाते आहे त्याचा अभ्यास करू...👇
टॅक्स भरण्यासाठी आपली कपात ही *80C* या सेक्शनमध्ये 150000 पर्यंत बचत करता येते त्यापेक्षा अधिक रक्कमेवर आपल्याला टॅक्स द्यावा लागतो....
NPS योजनेच्या बाबतीत मात्र 80C चे 3 भाग केलेले *पहिला भाग 80CCD (1), दुसरा भाग 80CCD(1b) तिसरा भाग आहे 80CCD (2)* आहेत माझ्या अभ्यासानुसार त्याचे खालील प्रमाणे विश्लेषण करता येईल....
*1)पहिला भाग 80CCD (1)*- यात LIC,होम लोन यासह 10% NPS कपातीसाठी 1,50,000 पर्यंत बचत करण्यासाठी सूट मिळते...(NPS कपात मात्र 1 लाखापर्यंतच करता येत)
*2)दुसरा टप्पा 80CCD (1b)* यासह दुसऱ्या टप्प्यात फक्त NPS धारकांना पुन्हा 50,000 पर्यंत बचत करण्यासाठी अतिरिक्त सूट दिली जाते....
*3)तिसरा टप्पा 80CCD (2)* हा टप्पा शासनाचा 14% एकूण वेतनात जमा होणारी रक्कम बचत करता येते तिला मर्यादा नाही...म्हणजे आपल्या खात्यात जमा होणारी 14% रकम ही पूर्णपणे टॅक्स फ्री आहे....
*आपण एक उदाहरण बघू...*
एका कर्मचाऱ्याची वर्षभरात NPS कपात 10% प्रमाणे एकूण 90000 रुपये कपात झाली......शासन हिस्सा 14% प्रमाणे 1,60,000 हजार रुपये मिळाला...
LIC,होम लोन व इतर बचत ही 110000 हजार झाली....
*पहिल्या 80CCD (1)* टप्प्यात जेथे 1,50,000 रुपये बचत करायची आहे, त्या ठिकाणी उदाहरणातील 90,000 NPS कपात पैकी तुम्ही 40000 रक्कम बचत दाखवू शकतात...व वरील प्रमाणे इतर बचत LIC, होम लोन 1,10,000 बचत म्हणजे तुमचं 1,50, 000 रुपयांचे लिमिट संपेल....पण NPS मधिल 50,000 उत्पन्न बाकी आहे....
*2)दुसऱ्या 80CCD(1b)* या NPS धरकांसाठी बनविलेल्या टप्प्यात वरील 50,000 बचत दाखविता येईल....म्हणजे TAX 0 (शून्य) लागेल....
*3) तिसरा 80CCD (2)* या टप्प्यात 14% प्रमाणे जमा शासन हिस्सा 1,60,000 रुपये टाका...या ठिकाणी बचतीचे लिमिट नाही....
अशा प्रकारे NPS व TAX याबाबत इन्कम टॅक्स साईट व याबाबतच्या अनेक व्हिडीओचा अभ्यास केल्यावर विश्लेषण करता आले..
आपला मुख्य उद्देश व लढा *जुनी पेंशन* मिळावी हाच आहे...त्यासाठी आपला लढा कायम आहे...फक्त आपण NPS योजना स्विकारली त्याबाबतीत TAX बाबत आपले समज-गैरसमज दूर व्हावेत हा हेतू.....
धन्यवाद...
🙏🙏🙏
आपलाच
*श्री.संदीप जगन्नाथ पाटील*
*जिल्हाकार्याध्यक्ष* जुनी पेंशन संघटना जळगाव.
*केंद्रप्रमुख* तोंडापुर ता.जामनेर...
*शिक्षक हितार्थ टिम जामनेर*
*पोस्ट फॉरवर्ड करतांना कुणीही नावात व इतर बदल करू नये ही विंनती*
Tuesday, 11 January 2022
Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा थकलेला महागाई भत्ता लवकरच मिळणार
Friday, 7 January 2022
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी व बदल
🏷️ वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी केली आहे, परंतु नोंदणी करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे. किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे.
तर SCERT च्या वतीने माहिती दुरुस्ती करण्यासाठी परत एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
👉काय आवश्यक आहे ?
यासाठी आवश्यक आहे. तुमचा नोंदणी क्रमांक.
👉 काय काय बदल करता येईल?
🛠️प्रशिक्षण प्रकार बदलता येईल
🛠️प्रशिक्षण गट बदलता येईल.
🛠️डबल नोंदणी रद्द करता येईल
👉त्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.
प्रशिक्षण संबंधित इतर माहिती
महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करिता हे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.
या संदर्भात सूचना पुढीलप्रमाणे :-
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.
- दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
- प्रशिक्षण नोंदणी दि. २३ नोव्हेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२१ पर्यत सुरु होती. मुदतवाढ 5 जानेवारी 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे.
- सदरचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबात नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधिताना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत. गट क्र. १ - प्राथमिक गट , गट क्र. २ - माध्यमिक गट, गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट, गट क्र. ४ - अध्यापक विद्यालय गट
- प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
- नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकवर तत्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
- प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येईल.
- नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण महती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास " माहितीत बदल करा." या बटनावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
- प्रस्तुत प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्हासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.
- सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी २०००/- रु. शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे.
- यासाठी स्वताच्या बँक खात्याचा सर्व तपशील सोबत ठेवावा.
- नोंदणी अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास स्वताच्या रजिस्टर इमेल वरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.