educational.maharashtra: शिक्षक बदल्या 2022 महत्त्वाचे अपडेट

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Wednesday 16 March 2022

शिक्षक बदल्या 2022 महत्त्वाचे अपडेट

शिक्षक बदली update

आंतर जिल्हा/जिहांतर्गत बदल्या २०२२


📢📣📢📣📢📣📢📣

*फेज वन मध्ये प्रोफाईल कशी except करावी* 

📣📢📣📢📣📢📣📢

✳️ *शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करून approval करिता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवलेली असेल  हि माहिती गटशिक्षणाधिकारी verify करून पुन्हा शिक्षकांना except  करण्याकरिता पाठविली जाईल ही माहिती except कशी करावी याकरिता वरील TTMS लोगोला टच करा किंवा खालील लिंक ला टच करा*


https://ott.mahardd.in/


➡️ *ओपन होणाऱ्या पेजवर मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा मेसेज मध्ये आलेला 6 अंकी OTP टाकून कॅपच्या टाका व लॉगिन करा*


➡️ *लॉग इन केल्यानंतर ओपन होणारे पेजवर*


*YOUR PROFILE HAS BEEN VERIFIED AND UPDATED BY YOUR BEO* 


➡️ *असा मेसेज दिसेल याचाच अर्थ आपली प्रोफाईल  गटशिक्षणाधिकारी यांनी verify केलेली आहे व आपणास except करण्याकरिता पाठवलेली आहे*


➡️ *प्रोफाईल except करण्याकरिता स्क्रीनवरील डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील तीन रेषांवर  क्लिक करा*


➡️ *क्लिक केल्यानंतर प्रोफाइल या ऑप्शनला टच करा  आपल्यासमोर आपली  प्रोफाइल दिसेल प्रोफाइल मधील संपूर्ण माहिती चेक करा आपण केलेली दुरुस्ती बरोबर  आहे किंवा नाही ते तपासा शेवटी*


*Previous* 

*Appeal to EO*

*Except*


*असे तीन टॅब दिसतील*


➡️ *अजूनही ही माहिती चुकीची असल्यास  वरील subject व*  *comments या दोन बॉक्समध्ये चुकलेल्या माहितीचा विषय व त्या संदर्भात कॉमेंट्स लिहून Appeal to EO या* *बटणावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर OTP बाबत पेज ओपन होईल तेथे  SEND OTP वर* *क्लिक करून आलेला OTP टाकून सबमिट करा* 

 *आपली अपील* *शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवली जाईल*


➡️  *व आपली प्रोफाईल बरोबर असेल तर कॉमेंट्स मध्ये OK लिहून Except* *या बटनावर क्लिक करा*

 *क्लिक केल्यानंतर OTP बाबत पेज ओपन होईल तेथे  SEND OTP वर* *क्लिक करून आलेला OTP टाकून सबमिट करा**

 

*Action performed successful*


*असा मेसेज दिसेल याचा अर्थ आपले फेज वन चे काम पूर्ण झालेले आहे व आपली प्रोफाईल शिक्षणाधिकारी त्यांच्याकडे पाठवण्यात आली आहे*


*फेज 1 मधील टप्पे व कालावधी*


➡️ *पहिला टप्पा*


*सर्व कार्यरत 100% शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे submit करणे.*


*नवीन वेळापत्रकानुसार कालावधी*

*13 जून ते 27 जून 2022*


➡️ *दुसरा टप्पा*


*गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे  प्रोफाईल तपासणे व Verify करून Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.*


*कालावधी - 13 जून ते 29 जून*


➡️ *तिसरा टप्पा*


*गटशिक्षणाधिकारी यांनी verify केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे appeal करणे.*


*कालावधी - 14 जून ते 01 जुलै*


➡️ *चौथा टप्पा*


*शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी शिक्षकांचे शिक्षकांचे appeal तपासून Verify करणे व Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.*


*कालावधी - 14 जून ते 03 जुलै*


➡️ *पाचवा टप्पा*


*गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी Verify केलेले प्रोफाईल शिक्षकांनी Accept करणे.शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाहीत.*


*कालावधी - 14 जून ते 05 जुलै*


➡️ *सहावा टप्पा*


*जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, आशा शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने (Force Acceptence) Accept करतील.*


*कालावधी - 06 जुलै ते 08 जुलै*


➡️ *सातवा टप्पा*


*वरील 6 टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल Acceptence 100% पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे Social appeal करता येईल.*


*कालावधी - 24 जून ते 10 जुलै*


➡️ *आठवा टप्पा*


*शिक्षकांनी केलेल्या Social appeal वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.*


*कालावधी - 11 जुलै ते 13 जुलै*


*सस्नेह धन्यवाद*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



📌 *ऑनलाईन बदली माहिती भरण्यासंदर्भात सुचना अपडेट :-*


1) ज्या शिक्षकांची *ऑफलाईन* पद्धतीने *आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली* झाली असेल...किंवा


2) ऑफलाईन प्रशासकीय पद्धतीतून - *पदोन्नती, अतिरिक्त समायोजन, शाळा एकात्रीकरण, पदपरावर्तन, अंशत बदल, इत्यादी* कारणाने शाळा बदल झाला असेल किंवा...


3) या जिल्ह्यातील प्रथम नियुक्ती दिनांकापासून आज रोजी पर्यंत कुठल्याही प्रकारची *बदली झाली नसेल* तर..


अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या लॉगीन वरील *Employment Details* या पेज मधील *"Last Transfer Category"* व *"Last Transfer Type"* मध्ये *NA (Not applicable)* हा रिमार्क निवडवा.


⏩ *Note :- वरील दोन्हीही टॅब या ऑनलाइन पद्धतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकरीताच लागू आहेत.*

*ऑफलाइन पद्धतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी "NA" हे Option निवडावे.*

================

*📌 ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वपूर्ण संबोध :-*


⏩ *Last Transfer Category :*


1) Cadre 1- *संवर्ग 1*

2) Cadre 2- *संवर्ग 2*

3) Entitled - *संवर्ग -3*

4) Eligible- *संवर्ग -4*

5) NA- *लागू नाही*


⏩ *Last Transfer Type :*


1) Inter District- *आंतर जिल्हा बदली*

(एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली )


2) Intra District- *जिल्हा अंतर्गत बदली*

( जिल्ह्याच्या आत मध्येच बदली)


3) NA- *लागू नाही*


================÷÷÷

*जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सन 2022*


1.   https://ott.mahardd.in/ या  बदली पोर्टल ला आपला मोबाईल टाकून OTP मिळाल्यानंतर लॉगिन केल्यावर आपल्या समोर सूचना येतील त्या काळजीपूर्वक वाचा.


2. डाव्या बाजूला मेनू मध्ये Profile दिसेल त्यावर क्लिक करा.

3. Profile   मध्ये दोन भाग आहेत.1. Personal details  व 2.employment details.


4. शिक्षकांना profile update करण्याची सुविधा *दिनांक 13/ 6/ 2022  पासून ते दिनांक 20/ 6/ 2022* पर्यंतच आहे.


5.वरील कालावधीत सर्व शिक्षकांनी आपले profile update करणे अनिवार्य आहे.


6. *Personal details* मधील माहिती आपल्याला बदलता येणार नाही.


7. *Employment details* मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करून अचूक काळजीपूर्वक बिनचूक भरायची आहे.


*8. Date of appointment* - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व आंतर जिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*


*9. Cast category* -  Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.


*10. Appointment category* - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा आपल्या मूळ नियुक्ती आदेशावर दिलेली आहे.त्यानुसारच नोंद करणे


*11. Current district joining date* - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व  आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*


12. Udise  code of current School - शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर चेक करूनच काळजीपूर्वक बिनचूक भरावा.


13. Current School joining date - यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे *(ऑर्डर वरील दिनांक भरू नये)*


14. *Current teacher type* - Graduate /  Under graduate यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा.


15. *Teaching subtype*  यामध्ये graduate teacher असेल त्यांनी *भाषा/ गणित -विज्ञान /समाजशास्त्र* यापैकी एक आपल्या आदेशात नमूद असलेला विषय सिलेक्ट करावा


16. *Teaching Medium* - या मध्ये Marathi/ Urdu आपल्या शाळेचे माध्यम निवडा.


17.*Last Transfer Category* - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होऊन आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.*(2019 मधील अवघड व सर्वसाधारण क्षेत्र)*


18.*Last Transfer Type* - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होऊन आलात तो प्रकार ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा लागू नसल्यास NA निवडा.


19.Have you been suspended in last 10 years ?

आपण मागील 10 वर्षात निलंबित झाले असल्यास yes नमूद करावे.

====================

*बदली पोर्टल*

*१००% शिक्षकांसाठी*

👇 

Website 

👇 

ott.mahardd.com 

👇

Mobile Number 

👇

Send OTP 

👇

मॅसेज बॉक्स मध्ये आलेला OTP टका 

👇

Abcs सारखे अल्फाबेट्स आत त्याला 

Captcha म्हणतात .

तो टाका 

👇

Accept 

👇

Accept 

👇

Profile 

👇

सध्या पेज १ पाहुन घ्यावे .

👇

*तारीख डीक्लीअर झाल्यावर पेज नंबर २ भरा वे व सबमिट करावे.*

👇

Beo Verify करतील 

👇

त्यानंतर Accept करावे 

फेज १ ची 

माहिती पुर्ण होइल 



    


 टिप -शिक्षकांना इ मेलवर otp येण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे..🙏


==================

ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. मा. ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन  घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 


*या प्रणालीचे वैशिष्टे :-*


🎯संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते. 


🎯यामध्ये मोबाईल नंबरने लॉगीन करता येते. 


🎯प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP येतो. 


🎯त्यामुळे सुरक्षितता अधिक आहे. 


🎯बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रीये संदर्भात व्हिडीओ बनविण्यात आलेले आहेत. 


🎯प्रत्येक सूचना वेळोवेळी इ मेल व एस एम एस दारे मिळेल. 


🎯याच्यामध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे. 


🎯या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली कि त्या संदर्भात PDF संबंधिताच्या

 मेलवर प्राप्त होते.


संबंधित बदली प्रक्रियेची वेबसाईट खालील प्रमाणे आहे. 


 http://ott.mahardd.com 👈🏻 शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट


 OTT.MAHARDD.COM :


👇👇👇 


 O = ONLINE


 T = TEACHER 


T = TRANSFER


MAHA  = MAHARASHTRA 


RDD = RURAL DEVELOPMENT DEPARTMENT 


 *IMP: **अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणीही माहितीत बदल करू नये.*

=================



शिक्षक बदली प्रक्रिया 3 Phase मध्ये होणार

1) Phase 1 : शिक्षक माहिती updation

2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली

3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली


आता लवकरच *Phase 1* सुरू होत आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2    व 3 सुरू होईल.


*Phase 1*.मध्ये खालील प्रकारे प्रक्रिया असेल

🏵️ शिक्षकांना त्यांचा मोबाईल नं व OTP ने लाँगीन करावं लागेल

🏵️ तिथे आपणास शिक्षक माहिती चे दोन भाग दिसतील

I) Personal Information 

ii) Employee Information

🏵️ Personal Information *read only* Mode मध्ये असेल तिथे आपणास बदल करता येणार नाही.

🏵️ Employee information मध्ये माहिती बरोबर असल्यास माहिती accept करावी. व त्रुटी दिसल्यास दुरुस्ती करावी व submit करावी.

🏵️ Submit केलेली माहिती BEO level ला जाईल. BEO सेवापूस्तकां नुसार माहिती तपासून approved करतील. तसेच आलेली माहिती चूक आढळल्यास दुरुस्ती करतील.

🏵️ सदर माहिती शिक्षक लाँगीन ला दिसेल. ती माहिती बरोबर असल्यास शिक्षकांनी accept करावी.

🏵️ BEO यांनी दुरुस्ती केलेली माहिती योग्य असल्यास Accept करावे. माहिती मान्य नसल्यास शिक्षक आपली माहिती मध्ये बदल करुन EO कडे अपील करु शकतील.

🏵️ EO कडे आलेली माहिती, EO योग्य पुराव्यानिशी माहिती approved किंवा बदल करतील.

🏵️ EO नी मंजूर केलेली माहिती आता final असेल.

🏵️ तसेच सर्व शिक्षकांची माहिती सुद्धा प्रत्येक शिक्षकांना आपल्या login मध्ये बघता येईल. एखाद्या शिक्षकांस दुसऱ्या एखाद्या शिक्षकांच्या माहिती मध्ये दोष दिसल्यास त्यांच्या विरोधात CEO कडे Social अपील करता येईल. CEO योग्य पुराव्यानिशी सदर शिक्षकांच्या माहिती मध्ये योग्य बदल करतील.


अशा प्रकारे Phase 1 प्रत्येक शिक्षकांना दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करणे आहे. 

@ अंतिम दिनांक पर्यंत शिक्षकांनी आपली माहिती Accept न केल्यास BEO आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व शिक्षकांची माहिती approved करतील. त्यांनंतर शिक्षकांना आपली माहिती update करण्याची संधी असणार नाही.

@ प्रत्येक क्षणी व प्रत्येक स्तरावर माहिती update करतांना OTP आवश्यक असणार आहे.

@ बदली प्रक्रियेत कुठल्या स्तरावर काय कसे बदल केले याची संपूर्ण माहिती शिक्षकांना email वर तसेच login मध्ये कळेल.


👆 फक्त माहितीस्तव




======{{}}===={{}}====={}===={}===





🎯संचमान्यता सन.२०२१- २२ व बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण ....!


*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

🎒विदयार्थी संचमान्यता सन २०२१- २२  बाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात असून आज दि.२८ एप्रिल २०२२ रोजी प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर साहेबांनी संचमान्यता बाबतचा आढावा सर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एका विसी द्वारे घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने आज शिक्षण राज्यमंत्री कार्यालयाकडून देखील माहिती घेण्यात आली. 


या प्रसंगी संचमान्यता २०२१-२२ ही अंतिम टप्प्यात असून शिक्षण संचालक यांच्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रा द्वारे एक ते पाच मुद्द्यांची समितीमार्फत पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पडताळणी समितीद्वारे देण्यात आलेला अहवाल सरल पोर्टल वर भरण्यासाठी लॉगिन ची सुविधा आज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या अहवालानुसार गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन वरून संच मान्यता अंतिम करण्यात येणार आहे.मात्र अद्यापही काही शाळांची कामे व पडताळणी राहिल्याचे दिसून आले. तरी पडताळणी सह सरल पोर्टल वर विद्यार्थी पटसंख्या चा अंतिम अहवाल भरण्यासाठी एक आठवड्याचा अवधी शिक्षण संचालकांच्या स्तरावरून देण्यात आलेला आहे. दिनांक 6 मे रोजी पर्यंत संच मान्यता २०२१-२२ अंतिम होणार असून त्यानंतर जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त व अतिरिक्त पदे स्पष्ट होतील .पश्चात लगेच अतिरिक्त शिक्षकांचे  ऑफलाइन समायोजन प्रक्रिया होणार आहे. समायोजन प्रक्रियेनंतर निवड रिक्त पदे व समानीकरण ची रिक्त पदे स्पष्ट होणार आहे.पळताळणी समितीचा अहवाल अपूर्ण अथवा काही शाळांची संचमान्यता अपूर्ण असल्यास त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


*💼जिल्हाअंतर्गत बदलीला सुरवात*


संच मान्यता 2021 22 व त्यानंतर ऑफलाईन समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ला नव्याने विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे सुरुवात होणार आहे साधारण  9 मे पर्यंत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार असल्याचे चित्र आहे. याबाबत ग्राम विकास स्तरावरून अधिकृत सूचना निर्गमित होणार आहेत.


राज्यातील बदली प्रक्रियेबाबत अनेक शिक्षकांची विचारणा होत असल्याने ही माहिती त्यांच्या सोईकरिता देण्यात येत आहे.


आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत रोस्टर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून रोस्टर तात्काळ अद्यावत करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.रोस्टर ची माहिती ही शिक्षणाधिकारी व नंतर सिईओ यांच्या स्वतंत्र लॉगिन वरून वेरीफाय करून ग्रामविकास स्तरावर फॉरवर्ड केली जाणार आहे.सर्व जिल्ह्यांचे रोस्टर अंतिम झाल्यावर विकसित होणाऱ्या संगणक प्रणालीवर प्रायोगिक तत्वावर बदली प्रक्रिया केली जाणार असून तदनंतर बदली प्रक्रियेला सुरवात होणार आहे .आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत सविस्तर व वस्तुनिष्ठ माहिती कलमर्यादित कार्यक्रमसह लवकरच देण्यात येईल.


===={{}===={}======{}{}====={}{}==={={}{======={}{=}=====

आंतर जिल्हा/जिहांतर्गत बदल्या २०२२


प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मोबाईल अँपद्वारे


पुणे: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित झाले आहे. या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या मसुद्याची फेरतपासणी केली जाणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

TEACHER PROFILE PHASE 1 video

https://youtu.be/GCLBj9qJbI8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राज्य सरकारने या फेरतपासणीसाठी ३४ जिल्हा परिषदांमधील मिळून १०२ जणांची तपासणी समिती स्थापन केली आहे. या समितीत प्रत्येक जिल्हा परिषदेतून सरासरी तीन सदस्यांचा समावेश केला आहे.

या फेरतपासणी समितीत प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, संगणक प्रोग्रॅमर, वरिष्ठ लेखनिक, डाटा एंट्री आॅपरेटर, सहायक प्रशासकीय अधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी आदी विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश केला आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषदेतून कनिष्ठ सहायक जीवन गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे आणि सहायक प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड या तिघांना या समितीत घेण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Inter District Transfer Proses PHASE 2

https://youtu.be/Ifd-_MzWgiI

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 याआधी या मसुद्यात सरकारने तब्बल ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार या ॲपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट करण्यात आलेली जिल्हानिहाय शिक्षकांची संख्या, सुगम व दुर्गम शाळांची नावे, सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती, आधार आणि पॅन कार्ड क्रमांकाची पुर्नपडताळणी करण्याचे सांगण्यात आले होते. शिवाय राज्य सरकारने मोबाईल ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांसाठी एक शिक्षक, एक मोबाईल नंबर अनिवार्य केला आहे.

राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केले आहे. नवीन बदली धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हे खास ॲप विकसित केले आहे. हे ॲप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या आॅनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत. या मोबाईल ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याची जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल अॅपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित केले आहे. आयुष प्रसाद यांच्याच अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पाच सीईंओंचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने राज्य सरकारला ही शिफारस केली होती. सरकारने ही शिफारस सरकारने स्वीकारली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💥 जिल्हा अंतर्गत बदली आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय

http://educationalmaharashtra.blogspot.com/p/download-1.html?m=1

💥 आंतर  जिल्हा बदली आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय

http://educationalmaharashtra.blogspot.com/p/1.html?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक  संगणकीय बदली प्रक्रिया 2022 अंतिम टप्प्यात*


1️⃣ *पहिला व्हिडिओ*


*शिक्षक माहिती बाबत*

*TEACHER PROFILE PHASE 1*


https://youtu.be/GCLBj9qJbI8


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2️⃣ *दुसरा व्हिडिओ*


*आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया कशी होणार याबाबत माहिती*

   *Inter District Transfer Proses PHASE 2*


https://youtu.be/Ifd-_MzWgiI


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  *श्री.आयुष प्रसाद (IAS)*

   _अध्यक्ष,बदली अभ्यास गट महाराष्ट्र राज्य  तथा CEO  जि प पुणे_


👆👆👆👆👆👆👆👆

=============================

शिक्षक बदल्या 2022


💥 शिक्षक बदली 2022 माहिती (डाटा) अपडेट संदर्भात खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


1. शिक्षक बदली साठी सर्व माहिती शालार्थ पोर्टल वरून घेतली जाणार आहे त्यासाठी सदर पोर्टल मधील शाळेची मुख्याध्यापकांची व शिक्षकांची माहिती update करावी.


2. शिक्षकांचा आधार कार्ड ,पॅन कार्ड ,मोबाईल नंबर,email id update करावा.


3. शिक्षकांचे इंग्रजी मधील नावाचे स्पेलिंग बरोबर आहे किंवा नाही ते तपासून योग्य ती दुरुस्ती करावी.


4. Attach / Detach आज रोजी जे शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहेत त्यांचीच माहिती त्या शाळेच्या शालार्थ प्रणालीत यायला हवी.शालार्थ प्रणालीत या पूर्वीच एखादे शिक्षक त्या शाळेवरून बदलून गेले असतील तर त्यांची माहिती ते शिक्षक ज्या शाळेवरून  बदली करून गेले त्या शाळेच्या शालार्थ प्रणालीतून (detached)कमी करून ते ज्या शाळेवर हजर झालेले आहेत तेथे त्यांची माहिती (attached )टाकायची आहे


5. शालार्थ प्रणालीत शाळेचा Udise नंबर काळजीपूर्वक भरावा. शाळेची प्रोफाइल update करावी.


👉 बदली विषयक latest update खालील लिंक वरुन मिळतील.

https://bit.ly/362Dfra

6.शिक्षकांचा भ्रमणध्वनी नंबर शालार्थ प्रणालीत भरताना काळजीपूर्वक भरावा, कारण बदली साठी शिक्षकांना sms जाणार आहेत.


7. शालार्थ updation कामकाज HM लॉगिन वरून करायचे आहे.


8. 25/03/2022 पर्यंत शालार्थ पोर्टल वरील शिक्षक माहिती update करण्याची अंतिम मुदत आहे,त्यानंतर त्यात कोणताही बदल होणार नाही व शिक्षक बदल्यांसाठी चुकीची माहिती शालार्थ पोर्टल वरून गेल्यास त्यास संबंधित मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💥 जिल्हा अंतर्गत बदली आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय

http://educationalmaharashtra.blogspot.com/p/download-1.html?m=1

💥 आंतर  जिल्हा बदली आतापर्यंतचे सर्व शासन निर्णय

http://educationalmaharashtra.blogspot.com/p/1.html?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


VC 17.03.22 मधील महत्त्वाचे अपडेट


1) UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे. 25 मार्च

2) शाळा नोंदणी व दुरुस्ती. 25 मार्च

3) शिक्षक डाटा चेक करणे 25 मार्च

4) अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे. 1 एप्रिल

5) user testing 1 एप्रिल

6) समानीकरण धोरण जाहीर करणे 25 एप्रिल

7) रोस्टर अपडेट करणे. 15 एप्रिल

8) आंतरजिल्हा बदली आदेश - बदली होईपर्यंत / सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील.

9) आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्ती साठी 10% ची अट राहील.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार!*
शिक्षक BEO आणि EO लॉगिन वरील डॅशबोर्डवर माहिती कशी भरावी आणि त्याची तपासणी कशी होणार याबाबत माहिती देणारे व्हिडीओ करण्यात आले. 


 *@ceo_zp_pune* कडून ट्विट...

https://twitter.com/PuneZp/status/1504074980107370498?t=hHeIqUSl18qV-IoaXXkyRw&s=08


पूर्ण ६ मिनिटाचा व्हिडिओ

https://www.facebook.com/punezillaparishad/videos/1380264592416702/

1 comment:

  1. The ultimate goal of best private school in Gurugramhigh school education in Gurgaon is to equip students with the knowledge, skills, and character necessary to succeed in their future pursuits, whether that be in higher education, the workforce, or personal life.

    ReplyDelete