educational.maharashtra: Computer Shortcut Keys:

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Sunday, 6 March 2022

Computer Shortcut Keys:



लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये ?

‘या’ Shortcut Keys चा होईल उपयोग; जाणून घ्या डिटेल्स

ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या प्रोजेक्टपर्यंत या सर्वांसाठी लॅपटॉप खूपच उपयोगी येतो. मात्र, लॅपटॉपवर काम करताना काही Shortcut Keys माहिती असणे गरजेचे आहे.
लॅपटॉपवर काम करताना Shortcut Keys येतील खूपच उपयोगी.
लवकर काम होण्यास उपयोगी येतील या शॉर्टकट की.

 Shortcut Keys विषयी जाणून घेऊया.

👉अनेकदा लोक कॉम्प्युटरला बंद करण्यासाठी विंडोवर टॅप करून शटडाउनचा पर्याय निवडतात. यामुळे कॉम्प्युटर बंद करण्यासाठी खूप वेळ जातो व मोठी प्रोसेस देकील आहे. परंतु, तुम्ही केवळ

👇

Alt + F4 

या शॉर्टकट की चा वापर करून थेट कॉम्प्युटर बंद करू शकता. 


👉 आपण सर्वसाधारणपणे टेक्स्ट कॉपी करण्यासाठी Ctrl+C चा वापर करतो. परंतु, तुम्ही 

👇

Ctrl+Insert

 वापरून देखील कोणताही शब्द सहज कॉपी करू शकता. 

👉 कीबोर्डवरील एखादे बटन चालत नसल्यास हा पर्याय खूपच उपयोगी येईल.
👇

Window + D

या शॉर्टकट की चा उपयोग करून तुम्ही थेट डेस्कटॉपवर पोहचू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही टॅबला मिनीसाइज करण्याची गरज पडणार नाही. 

👉तसेच, स्मार्टफोनवर स्क्रीनशॉट काढणे आता नियमित झाले आहे. याची प्रोसेस देखील सोपी आहे. परंतु, कॉम्प्युटरवर स्क्रीनशॉट कसा काढायचा याची माहिती बऱ्याच जणांना नसते. परंतु, तुम्ही 

👇

Window + Shift + S 

चा वापर करून स्क्रीनवर खास भागाचा स्क्रीनशॉट काढू शकता. हा स्क्रीनशॉट तुम्हाला कोणालाही सेंड करता येईल. ही शॉर्टकट की काम करत नसल्यास तुम्ही स्क्रीनशॉटसाठी 

👇

press Alt+PrtScn, Windows Logo Key + PrtScn button आणि CTRL + Print Screen 

चा देखील वापर करू शकता. दरम्यान, या Shortcut Keys मुळे तुमचे काम देखील लवकर होईल व वेळ देखील वाचेल.

✒️✒️✒️✒️✒️

1 comment:

  1. Amazing Blog!!! Keep writing blogs like this for our information, looking forward to read more blogs.

    Checkout complete details about IPU CET BBA

    ReplyDelete