educational.maharashtra: जवाहर नवोदय विद्यालय बाबत संपूर्ण माहिती

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Saturday 13 August 2022

जवाहर नवोदय विद्यालय बाबत संपूर्ण माहिती

*"जवाहर नवोदय विद्यालय"*
*A to Z माहिती*

*हा एक मेसेज मुलांच्या आयुष्यात बदल घडवणारा ठरेल.*

  *इ. 5 वी च्या पालकांपर्यंत व मुलांना share करा.*

'जवाहर नवोदय विद्यालय’  ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना राजीव गांधी यांनी मांडली होती. ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात. यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो. येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते. या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी -प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे 6000-7000 विद्यार्थी नवोदय ची परीक्षा देतात ज्या परीक्षेत top 80 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना 6वी -12वी मोफत शिक्षण मिळते. ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी  देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.

देशातील गुणवंत, गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यातच मोफत दर्जेदार शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. यानुसार भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यातच उच्च दर्जाच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या जिल्ह्यानिहाय नवोदय विद्यालय सुरू करण्यामागचा केंद्र सरकारचा मुख्य हेतू आहे. केंद्र सरकारने १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी) मंजूर केले आहे. या धोरणातील तरतुदीचाच एक भाग म्हणून भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेली ही स्वायत्त संस्था आहे. येथील अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) असतो.

या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नि: शुल्क शिक्षण देण्यात येते. निवास व भोजनाची मोफत सोय केली जाते. याशिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके, क्रीडा साहित्य, लेखन सामग्री, स्टेशनरी आदींचा सर्व खर्चही विद्यालयामार्फतच करण्यात येतो. या विद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी ७५ टक्के जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी दरवर्षी लेखी परीक्षा घेण्यात येते. या परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

●प्रवेशासाठी पात्रता निकष:
इच्छुक विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असावा
फक्त स्वत:च्या जिल्ह्यातच प्रवेश घेता येतो
संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणे अनिवार्य
प्रवेशासाठी निश्र्चित केलेली वयाची अट पुर्ण करावी लागते
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.
 
● आवश्यक कागदपत्रे:
विहित नमुन्यातील अर्ज
पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याबाबतचा सक्षम पुरावा
जन्म प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास, जात प्रमाणपत्र
अर्जदार विद्यार्थ्याची दोन छायाचित्रे.

● अर्ज कुठे कराल?
या प्रवेशाबाबतच्या लेखी परीक्षेची जाहिरात दरवर्षी स्थानिक पातळीवरील दोन नामवंत दैनिकांत प्रसिद्ध होत असते. आपला पाल्य शिक्षण घेत असलेल्या शाळांकडे आपापल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या पत्ता उपलब्ध असतो. जाहिरातीत दर्शविलेल्या ठिकाणी अर्ज करावा लागतो.

● नवोदय विद्यालयात सहावी आणि नववीसाठी प्रवेश घ्यायचाय?
इयत्ता 9 वीच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage या वेबसाईटला भेट द्यावी तर सहावीच्या वर्गासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावा.

 
● नवोदय प्रवेश परीक्षा चाचणी स्वरूप व माहिती

1. चाचणीचे स्वरूप

·         एकच संयुक्त प्रश्नपत्रिका : 100 गुण

·         वेळ : 2 तास

·         मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

- विभाग एक

·         मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)

नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयात एकूण दहा भाग असतात. दहा भागांत प्रत्येकी चार-चार प्रश्न असून एकूण 40 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात. प्रत्येक

 भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश आहे.

-  विभाग दोन

·         अंकगणित : (20 प्रश्न 25 गुण)

 या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उददेश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूतक्षमता तपासणे हा आहे.

 टीप : अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो.


-  विभाग तीन
·         भाषा : (20 प्रश्न 25 गुण)
यात 4 उतारे असतात.प्रत्येक उताऱ्यात 5 प्रश्न असतात.तुमचे भाषा विषयाचे ज्ञान यातून तपासले जाते.

🎖️🥇🥇

6 comments:

  1. Quality education is an essential step towards increased health, income generation, occasion and choice. Your donation helps further than 1000 vulnerable children to pierce classroom inventories, library books, uniforms, nutritional food, clean water, medical care as well as high-quality education, adulterous conditioning, comforting and other support.
    https://www.iwcwtministry.org/donate-for-education/

    ReplyDelete
  2. PRINCE2 CERTIFICATION is a correspondence based procedure for solid undertaking the pioneers, and will give you the huge limits you really need to change into a useful endeavor chief. It tends to PRojects IN Controlled Environments, and is utilized and seen starting with one side of the planet then onto the next.

    ReplyDelete
  3. We really appreciate to read your blog, we can say that, Education is most important for all citizens specially a perfect democratic country requires best command. Therefore here is the role of IAS Coaching is spread all over India, civil service exams requires the awareness of Daily Current Affairs

    ReplyDelete
  4. Sharda International School is one of the top schools of Gurgaon. This school offer a comprehensive curriculum that includes academics, sports, and extracurricular activities to ensure holistic development of the students.

    ReplyDelete
  5. If you're looking for the best trading account in India 2023, Angel Broking could be a great choice. It allows you to trade stocks, bonds, mutual funds and more.

    ReplyDelete