educational.maharashtra: शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पद भरणेबाबत माहिती

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

!!! सुस्वागतम !!! आपले या ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे.

Friday 6 May 2022

शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पद भरणेबाबत माहिती

*शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम 20 मे 2022 पर्यंत जाहीर करण्याचे ग्रामविकास विभागाचे निर्देश ; जाणून घ्या पदांची अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व संदर्भ पुस्तके*
       शालेय शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढीसाठी क्षेत्रीय स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे महत्वाची असतात, मात्र सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सदर पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा लोकप्रतिनिधी मार्फत होत असल्याने सदरची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत 20 मे 2022 पर्यंत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे. सदरची पदे 10 जून 2014 रोजीच्या अधिसूचनेनुसार सरळसेवा, विभागीय निवडीद्वारे व पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार आहेत. 

*10 जून 2014 अधिसूचना नुसार शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पात्रता*

*1.शिक्षण विस्तार अधिकारी*

पात्रता : 1) 50% गुणासह पदवी व B.Ed.
            2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव 
            3) वयो मर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल ) 

निवड : 1) सरळसेवेद्वारे 50%
           2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 25% 
          3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 25%

*2.केंद्रप्रमुख पदासाठी*

पात्रता : 1) 50% गुणासह पदवी व B.Ed.
            2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव 
            3) वयो मर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल ) 

निवड : 1) सरळसेवेद्वारे 40%
           2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 30% 
          3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 30%
          4) भाषा , गणित विज्ञान , समाजिक शास्त्र नुसार पदे भरली जातात. 

*शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम स्वरूप*
        केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 9/9/2019 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.या पदासाठी 200 गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.शिक्षण विस्तार अधिकारी पदाचाही अभ्यासक्रम केंद्रप्रमुख पदाप्रमाणेच असू शकतो, याबाबत केंद्रप्रमुख पदाप्रमाणेच शासन निर्णय किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर अभ्यासक्रम अधिकृतपणे समजू शकतो.

*केंद्रप्रमुख परीक्षाचे स्वरूप व अभ्यासक्रम*

     शासन निर्णय 9 सप्टेंबर 2019 नुसार केंद्रप्रमुख पदासाठी
एकून 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

*पेपर 1 हा 100 गुण 100 प्रश्न*
*पेपर 2 हा 100 गुण 100 प्रश्न*

▪️  *पेपर - 1 -  बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
( 100 प्रश्न - 100 गुण ) 

• *बुद्धिमत्ता -* आकलन , वर्गीकरण ,  सहसंबंध संख्या व अक्षरे , संख्या / अक्षर मालिका , लयबद्धता , तर्क व अनुमान भाषिक व अभाषिक , अनुमान , कुट प्रश्न , गणित कोडी , सांकेतांक भाषा , आकृती , भाषिक बुद्धिमत्ता , अभाषिक बुद्धिमत्ता इत्यादी 

•  *अभियोग्यता -* गणितीय चाचणी , तार्किक प्रश्न , भाषिक क्षमता मराठी , भाषिक क्षमता इंग्रजी , अवकाशिय संबोध , कल , आवड , व्यक्तीमत्व विकास , अचुकता , निर्णय क्षमता , व्यवहारीक गणित ,  इत्यादी 
      केंद्र प्रमुख पेपर एकच्या अभ्यासासाठी पुढील महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ पुस्तके उपयुक्त ठरतील.
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर व डॉ.अनिरुद्ध
*3.शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (के'सागर पब्लिकेशन्स)*- सदरचे पुस्तक शिक्षक अभियोग्यता घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
        वरील पुस्तके केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा समजून परिक्षाभिमुख तयारी  करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.
        तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
         मराठी भाषिक क्षमतेसाठी  के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे  यांची पुस्तके अभ्यासावीत.
        इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
       यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी *स्वाती शेटे मॅडम यांचे "शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी"* हे के'सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.

       *पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह*
       यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.
        केंद्र प्रमुख पेपर दोनच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, शिक्षण विषयक सर्व कायदे व योजना,अद्ययावत शासन निर्णय, केंद्रीय व राज्य पातळीवरील शिक्षण विषयक संस्थांचे रचना व कार्य,माहिती तंत्रज्ञान वापर, अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती,माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन, शालेय विषयांचे आशयज्ञान व सामान्यज्ञान, संप्रेषण कौशल्य, चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक व क्रीडा विषयक इत्यादी बाबींचा समावेश आहे.प्रस्तुत केंद्र प्रमुख सविस्तर अभ्यासक्रमासाठी 9 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे.थोडक्यात पेपर दोनचा अभ्यासक्रम व त्यास घटकनिहाय गुण पुढीलप्रमाणे आहेत.

▪️ *पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह* 

1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण

•  शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण

•  माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण

• अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण

•  माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण

• वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण

• संप्रेषण कौशल्य  - 5 गुण

    *एकूण - 100 गुण* 

 केंद्र प्रमुख पेपर दोनसाठी महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ पुढीलप्रमाणे आहे.
*१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे*
         सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.तसेच केंद्र प्रमुख अभ्यासक्रमाची व्याप्ती व त्यावर घटकनिहाय विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करता येईल.
       तसेच केंद्र प्रमुख परीक्षा तसेच शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा  अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - डॉ.शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स
2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(सातवी आवृत्ती)
          केंद्र प्रमुख पेपर क्रमांक एक व दोन चा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक आहे.केंद्र प्रमुख परीक्षेची जाहिरातीबाबत शासन पातळीवरील हालचाली पाहता(ग्रामविकास विभाग यांचे पत्र  5 मे 2022 रिक्त जागा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याचे विभागीय आयुक्त यांना पत्र तसेच शासन निर्णय 9 सप्टेंबर 2019 द्वारे नवीन अद्ययावत केलेला अभ्यासक्रम) यामुळे सदरची जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे, तसेच ही पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने लवकरच परीक्षेद्वारे भरली जातील, तेव्हा केंद्र प्रमुख पदाचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन पात्र शिक्षकांनी सखोल अभ्यासाला त्वरित सुरवात करून परीक्षेतील आपले यश सुनिश्चित करावे.
             शुभेच्छा.......

2 comments:

  1. With a focus on academics, co-curricular activities, and character building, school education in Gurgaon is designed to prepare students for success in all aspects of their lives.

    ReplyDelete